ना अप्रेजल, ना KRA, ना पगारवाढ, शेतकऱ्याचं दरवर्षीच हाल, 2015 ते 2025 शेती नुकसानीची हादरवणारी


Maharashtra Rain Marathwada Flood: अतिवृष्टीमुळे राज्यातील (Maharashtra Rain) अनेक जिल्हे मोठ्याप्रमाणावर बाधीत झालेले आहेत. शेतकरी अक्षरश: कोलमडून पडलाय. राज्यातील मंत्र्यांचेही (Maharashtra Goverment) दौरे सुरू झाले आहेत. मात्र ठोस अशी मदत घोषित या नुकसानीची करण्यात आलेली नाही. मागील 9 वर्षांत 571.30 लाख हेक्टर शेतीच नुकसान (Farmer Loss) झाल्याची डोळे दिपवणारी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे या जगाचा पोशिंदा बळीराजा (Maharashtra Farmer) जगणार कसा असा प्रश्न समोर येत आहे. नेमकी काय आहे आकडेवारी, जाणून घ्या…

एरवी उद्योगपती आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, हे पाहत असतात. तर नोकरदार वर्ग प्रत्येकवर्षी आपला पगार कसा वाढेल, याची चिंता करत असतो. थोडीशी निराशा सोडली तर नोकरदारांच्या अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण होतात. याची तुलना शेतकऱ्यांशी करायची झाल्यास शेती हा अलीकडच्या काळात अक्षरश: आतबट्ट्याचा उद्योग झाला आहे. एकीकडे बाजारपेठेत पिकांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता शेतकऱ्यांना नेहमी सतावत असते. अशात अतिवृष्टीने (Heavy rain) शेतामधील सर्व पीक नष्ट झाल्यावर या शेतकऱ्यांचे फक्त त्याच वर्षाचे नव्हे तर पुढील अनेक वर्षांचे गणित कायमचे विस्कटून जाते. अतिवृष्टीत सर्वस्व गमावल्यानंतर (Maharashtra Rain) शेतकऱ्यांना सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही. त्यामुळे अनेक वर्षे शेतकरी कर्ज आणि गरिबीच्या दुष्टचक्रात अडकून पडतात.

1. 2015-2014-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ५६.५० लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ५३.४८ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ४१९०.६२ कोटी

2. 2014-2014-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ६.८५लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- १०.५३लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ६०२.८३ कोटी

3. 2014-2014-

  1. अवकाळी, किडीचा प्रादुर्भाव पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ४६.१२ लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ५८.७२ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ३६२२.५० कोटी

4. 2014-2017-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ९१.३५ लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ८४.३२लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ६२१८.३४ कोटी

5. 2019-2020-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ९६.५७ लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- १०८.०९ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ७७५४.०६ कोटी

6.2020-2021-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ४५.६४ लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ७०.७२लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ४९२३.७८ कोटी

7. 2021-2022 मध्ये-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र -५७.५६ लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ७९.१७ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ५६४७.४४ कोटी

8. 2022-2023 मध्ये-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ६७.१२लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ९४.१८ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ८६३७.४४ कोटी

9. वर्ष 2023-2026 मध्ये-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ५२.०६ लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ६९.०४ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ६४२१.६३ कोटी

10. 2024-2025-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र – ५१.५३लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या- ७१.४७लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ६६६०.५१ कोटी

2015 पासुन ते 2024 पर्यंत एकूण नुकसान-

  1. अवकाळी पाऊस आणि गारपिट
  2. बाधित क्षेत्र -५७१.३०लाख हेक्टर
  3. बाधीत शेतकरी संख्या-६९९.७२ लाख शेतकरी
  4. मंजूर निधी – ५४६७९.१७  कोटी

मागील नऊ वर्षांमध्ये मोठं नुकसान- (Huge losses farmer in the last nine years)

मागील नऊ वर्षांमध्ये एवढं मोठं नुकसान झालंय. तर यावर्षीच्या खरीप हंगामातील आतापर्यंत 69 लाख एकर वरती नुकसान झालंय. तर या महिन्यात जवळपास 30 लाख एकरच नुकसान झालंय. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही आकडेवारी अधिकची वाढण्याची दाट शक्यता आहे.

https://www.youtube.com/watch?v=zozxgggb4n0o

संबंधित बातमी:

मराठी-Pratap Sarnaik Photo On Help Kit: मदतवाटपातही प्रचार; मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे अन् प्रताप सरनाईकांचे फोटो, नागरिक म्हणाले, टेम्पो परत घेऊन जा!

आणखी वाचा

Comments are closed.