HSC RESULT बारावीचा आज निकाल

राज्य शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा (एचएससी) निकाल उद्या सोमवारी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 दिवस आधीच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 21 मे रोजी बारावीचा निकाल लागला होता. यंदा सीबीएसईचा निकाल जाहीर होण्याआधीच राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होत आहे हे विशेष.
– mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल.
– http://hscresult.mkcl.org mahahsWoard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येईल.
– गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येईल. 6 ते 20 मेदरम्यान अर्ज करता येतील. z विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेत आपला निकाल सुधारता येईल. जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी, श्रेणी सुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्यांसाठी 7 मेपासून मंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करता येतील.
Comments are closed.