Maharashtra ias transfer list kunal khemnar new midc joint ceo mantada raja dayanidhi cidco ceo collector change in marathi


IAS Transfer : मुंबई : नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (maharashtra ias transfer list kunal khemnar new midc joint ceo mantada raja dayanidhi cidco ceo collector change)

राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली आता एमआयडीसी सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे. तर सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी हे आता सिडकोचे सहव्यवस्थापक असतील

कोणत्या अधिकाऱ्यांची बदली?

1. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली एमआयडीसीचे सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे.
2. सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी यांची बदली सिडकोच्या सहव्यवस्थापकपदी करण्यात आली आहे.
3. सारथीचे एमडी अशोक काकडे यांची सांगली जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
4. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – Naxal Encounter : महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवर पुन्हा नक्षलवादी – सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक, नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त

राज्यातील 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेल्याच आठवड्यात काढण्यात आले होते. या नव्या सरकारने सत्तेत आल्यानंतर प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सातत्याने केल्या जात आहेत. तर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या सुरू असल्याचे दिसते आहे.

हेही वाचा – Mumbai : माघी गणेशमूर्तींचे केवळ कृत्रिम तलावातच विसर्जन, काय आहेत पालिकेचे आदेश?



Source link

Comments are closed.