Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!
विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपचे गोकुळ गिते माघार घेण्यासाठी तयार नव्हते त्यामुळे शिवसेनेचा बीपी हाय झाला होता.. आता जळगावात शिवसेनेच्या रेश्मा काळे मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय… नाशकात गोकुळ गितेंनी माघार घेण्यासाठी दहा दिवस लावले… आता जळगावात रेश्मा काळे भाजपला किती दिवस वेटिंगवर ठेवतात हे पाहावं लागेल… जळगाव विधान परिषदेच्या लढतीतून,शिवसेनेच्या रेश्मा काळे माघार घेतील….याबद्दल देवेंद्र फडणवीसांच्या टीमचे संकटमोचक गिरीष महाजन यांना फुल कॉन्फिडन्स आहे..नाशिकमध्ये भाजपच्या गोपाळ गितेंनी माघार घेऊन शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा मार्ग मोकळा केलाय..इस हात दो उस हात लो… असं भाजप आणि शिवसेनेनं नाशिक आणि जळगावबाबत ठरवलं होतं. या राजकीय सौद्यानुसार, आता जळगावातून शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी प्रचार थांबवून….भाजपच्या नंदकिशोर यांचा मार्ग सुकर करणं अपेक्षित होतं. पण नाशिकचा तिढा सुटून चोवीस तास उलटल्यानंतरही,रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
Comments are closed.