Maharashtra Kesari 2025 ajit pawar on organizers mahindra thar 18 bullet bike 30 gold rings prizes pruthviraj mohol


महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 फेब्रुवारी) पार पडला. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात हा अंतिम सामना झाला. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली आणि 67 वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान पटकवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

मुंबई : महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 फेब्रुवारी) पार पडला. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात हा अंतिम सामना झाला. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली आणि 67 वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान पटकवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मात्र, या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळ याला देण्यात आलेल्या बक्षिसांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजकांना सल्ला दिला आहे. (Maharashtra Kesari 2025 ajit pawar on organizers mahindra thar 18 bullet bike 30 gold rings prizes pruthviraj mohol)

महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेचा अंतिम सामना बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे पार पडला. या स्पर्धेनंतर विजयी पृथ्वीराज मोहोळ याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा व ‘थार’ या चारचाकी गाडीची चावी देण्यात आली. यावेळी अजित पवारांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करत नगरच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही दिला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांनी आयोजकांनाही सल्ला दिला.

नेमकं का म्हणाले अजित पवार?

“महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना थार मोटार, बुलेरो कार तसेच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर, 30 सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षीस दिली जाणार आहे. मला कुठे पाहायला मिळाली नव्हती. पुढच्या वेळेस जे स्पर्धा घेणार आहेत, त्यांनी या बक्षिसांचा विचार करावा आणि स्पर्धा घ्यावी. कारण शेवटी हा पायंडा पडतो”, असं म्हणत अजित पवार यांनी आयोजकांना सल्ला दिला.

याशिवाय, “माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दत्ता भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आम्ही यापुढे कोणतीही स्पर्धा असेल, कोणताही खेळ असेल, त्याबाबत राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्याबाबतीत कमी पडणार नाही”, असेही आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिलं.

अतीतटीचा सामना

अतीतटीच्या झालेल्‍या या लढतीत महेंद्र गायकवाडला पृथ्‍वीराज याने चांगलीच टक्‍कर दिली. पहिल्‍या राऊंडमध्ये दोघांनी एक – एक गुण घेतला होता. दुसऱ्या राऊंड मध्ये मोहोळ व गायकवाड यांची तुल्‍यबळ लढत झाली. अगदी शेवटच्या मिनिटाला पृथ्‍वीराजने एक गुण मिळवला. पण पंचाचा हा निर्णय महेंद्र गायकवाडला मान्य झाला नाही, त्‍याने कुस्‍ती अर्धवट सोडली. त्‍यानंतर पंचानी दोन गुण मिळवलेल्‍या पृथ्‍वीराज मोहोळला विजयी घोषीत केले.


हेही वाचा – Indian Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम



Source link

Comments are closed.