शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटी देऊ; प्रशिक्षक रणधीर पोंगल यांचे थेट आव्हान

महाराष्ट्र केसरी 2025: अहिल्यानगर येथे झालेली 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात (Maharashtra Kesari 2025 Controversy) सापडली आहे. यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) यांच्यात झालेल्या कुस्तीचा निकाल सदोष असल्याचा आरोप शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांचे प्रशिक्षक आणि भावाने केला आहे. एवढेच नाही तर शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल, असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल (Randhir Pongal) यांनी जाहीर केल आहे.

तसेच काका पवार तालमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर शिवराज राक्षे यांचे भाऊ युवराज राक्षे यांनी शिवराज राक्षेच्या अनेक कुस्त्यांचे दाखले देत शिवराजच्या खेळ आणि स्वभाव सांगत पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय आहे असं म्हंटल आहे. शिवराजला पंचांकडून शिवीगाळी झाल्यामुळेच त्यावर पंचाला लाथ मारण्याची वेळ आली असं युवराज राक्षे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवराज राक्षेचा भाऊ युवराज राक्षे आणि कोच रणधीर सिंह पोंगल यांच्याशी बातचीत केली असता ऐकूणच त्यांनी या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शिवराजचा भावाचे नेमकं म्हणणं काय?

शिवराज राक्षेचा हा जवळ जवळ 16 वर्षापासून कुस्ती खेळतोय. आजवरच्या त्याच्या कुस्तीच्या कारकिर्दीतले सर्व सामने अथवा त्याचे व्हिडिओ तपासून पाहा, विजयाने तो हुरळून जात नाही तर पराभवाने खचूनही जात नाही. खेळ म्हटला तर हार-जीत ही आलीच आणि पराभव स्वीकारण्याची त्याची ताकद देखील आहे. हरला असता तर निर्णय मान्य आहे. मात्र हरलोच नसेल तर ते मान्य कसं करणार? पंचाला लाथ मारली हे सर्वत्र दिसतंय. मात्र त्यावेळी त्याला खालून शिवीगाळ झाल्यामुळे शिवराज राक्षे यांनी रागात हे पाऊल उचलले असल्याचे युवराज राक्षे यांनी म्हटले आहे.

राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत- डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील

शिवराज राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत, मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना  या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलोय. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.  पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त असल्याची प्रतिक्रिया देत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.