गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर; महारेराकडे आठ वर्षांत 50 हजारांहून अधिक प्रकल्प नोंदवले

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी आठ वर्षात 50 हजारांचा पल्ला ओलांडला आहे. 50 हजार नोंदणीपृत प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे, पेंद्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या संकेतस्थळानुसार देशातील सर्व रेरा प्राधिकरणांकडून 1,44,617 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 35 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्प एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. दुसऱया क्रमांकावर असलेल्या तामीळनाडूत 27, 609 आणि तिसऱया क्रमांकावरील गुजरातमध्ये 15,322 प्रकल्प नोंदवले आहेत.
महारेराची स्थापना 2017 साली करण्यात आली. नुकताच महारेराचा आठवा वर्धापन दिन झाला. आठ वर्षांत महाराष्ट्रात नोंदवलेल्या एपूण प्रकल्पांपैकी 12,788 गृहनिर्माण प्रकल्प एकटय़ा पुणे जिह्यातील असून यानंतर ठाणे जिह्यातील 6746, मुंबई शहरात 1284, मुंबई उपनगरात 5907, रायगड जिह्यातील 5360 अशी प्रकल्पांची संख्या आहे. राज्यातील एपूण प्रकल्पांपैकी मुंबई महानगराचा समावेश असलेल्या कोकणात 23, 770 असे सर्वात जास्त प्रकल्प आहेत. त्यानंतर पुणे परिसरात 15,932, उत्तर महाराष्ट्रात 4621, नागपुरात 2764, छत्रपती संभाजीनगरात 1886 आणि अमरावतीतील एपूण गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या 957 आहे.
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱया गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या 50 हजारांवर गेली आहे. उद्योगस्नेही, सतत प्रगतिपथावर असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद बाब आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर किंवा पुणे परिसरापुरते काही प्रमाणात मर्यादित असलेले स्थावर संपदा क्षेत्र आता राज्यात सर्वत्र विस्तारते आहे.
मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा
Comments are closed.