महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा फक्त एका क्लिकवर…
नागपूर बातम्या : नागपूर महापालिकेचा प्रभाग 22 भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रभाग आहे. कारण याच प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय (हेडकॉटर) येतो. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघ मुख्यालयात राहणारे संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी याच प्रभागातील मतदार आहेत. मात्र, यंदा प्रभाग 22 मधील भाजप नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आरोप करत तसेच प्रभागातील आवश्यक विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत एक तरुण स्वयंसेवक भाजप उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. अवघ्या पंचवीस वर्षाच्या निनाद दीक्षित या तरुण स्वयंसेवकाने नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून तो नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या “फॉरवर्ड ब्लॉक” या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मला संघाच्या अनेक स्वयंसेवकांचा छुपा पाठिंबा असून माझी ही लढाई या भागात तसेच पारंपरिक राजकारणात परिवर्तनासाठी असल्याचे निनाद दीक्षितचे म्हणणे आहे. संघाचा मुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मध्ये भाजप, काँग्रेस सह सर्व पक्षांसमोर निनाद दीक्षित या तरुण स्वयंसेवकाने एक वेगळेच आव्हान निर्माण केले आहे.
काय म्हणणे आहे…
प्रभागाच्या राजकीय स्थितीत बदल घडावे अशी अपेक्षा मात्र भाजप, काँग्रेस सारखे पक्ष ते बदल करू शकत नाही.. म्हणून नागरिक समितीच्या माध्यमातून माझी उमेदवारी..
* भाजपच्या नगरसेवकांनी संघाचा मुख्यालय असलेला प्रभाग दुर्लक्षित केले.
* भाजपने नुसते गट्टू टाईल्स आणि सिमेंटचे बांधकाम केले.. लोकोपयोगी काम कुठे आहे..
* भाजप आणि काँग्रेसने नागपुरात जनतेला गृहीत धरले आहे..
* जर तीन चार टर्म होऊन, 60 वर्ष वय असलेले नगरसेवक बाजूला होणार नाही, तर तरुणांना संधी कशी आणि कधी मिळेल..
* महाराष्ट्र महाविद्यालयीन निवडणुका बंद करून ठेवल्या आहे.. तरुणांनी जायचे कुठे, ते राजकारणात येणार कसे…
* राजकीय पक्ष तरुणांना फक्त पळायला लावणार, त्यांच्या माध्यमातून मते मिळवणार, मात्र तरुणांना संधी देणार नाही म्हणून नागरिक समितीच्या माध्यमातून माझी उमेदवारी आहे..
* व्यवस्था बदलविण्यासाठी आम्ही किमान एका प्रभागात तरी लढा देऊ शकतो.. तेच आम्ही करतो आहे..
* माझी उमेदवारी बंडखोरी कशी होईल.. मी भाजपचा प्राथमिक सदस्य नाही, मी भाजपची उमेदवारी मागितली नाही, म्हणून माझी बंडखोरी नाहीच.. मात्र भाजपच्या विरोधात माझा उठाव निश्चित आहे..
* संघाचे मला समर्थन आहे असा माझा दावा नाही, मात्र, अनेक स्वंयसेवक निश्चितच शांतपणे माझ्या पाठीशी आहे…
Comments are closed.