Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी

Maharashtra Live Blog Updates: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक राजकारणातला चर्चेतला विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक भागात महायुती की माविआ म्हणून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. 17 नोव्हेंबरही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल आहे.

 

Comments are closed.