Maharashtra Live blog Updates: नवनिर्वातीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी समा
Maharashtra Live blog Updates: नवनिर्वातीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सीपी राधाकृष्णन यांना शपथ देतील. या सोहळ्याला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे उपस्थित राहणार आहेत. जगदीप धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. त्यानंतर या पदासाठीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना विजय झाला. तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरकरट शब्द नसून पुरावे असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तसंच ओबीसी समाजानं भूमिका मांडण्याऐवजी आधी जीआर नीट वाचावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्यात. तसचं हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहानानंतर ओबीसी नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पहावं लागणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.