Maharashtra Live Blog Updates: पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा भडका, राज्यासह देश-विदेशा

मुंबई विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या ३०४ परीक्षा बंद

शून्य नोंदणी असलेल्या १२५ परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या १७९ परीक्षा बंद

मागील दोन ते तीन शैक्षणिक वर्षापासून ज्या अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नाही किंवा शून्य नोंदणी आहे अशा १२५ परीक्षा आणि ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी हा १० वर्षे पूर्ण झालेला आहे अशा १७९ परीक्षा या मुंबई विद्यापीठातर्फे निष्क्रिय परीक्षा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे घेतल्या जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आला आहे. यामध्ये शून्य नोंदणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या २३ परीक्षा

मानवविज्ञान विद्याशाखेच्या १५ परीक्षा
आंतरविद्याशाखा ४२ परीक्षा

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ४५ परीक्षांचा समावेश आहे.

या परीक्षांना मागील दोन ते तीन वर्षांपासून शून्य नोंदणी असल्यामुळे या परीक्षा विद्यापीठाकडून बंद करण्यात येत आहेत.

तथापी या अभ्यासक्रमांना कोणत्याही संलग्नित महाविद्यालयातील किंवा संस्थेकडून विद्यार्थी नोंदणी बाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास फक्त या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

यासाठी विद्यापीठाकडून या परीक्षा पूणर्रकार्यान्वित केल्या जाणार असून परीक्षा कार्यक्रम, प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षक नियुक्ती व इतर परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाकडून नियमानुसार राबविण्यात येईल.

मात्र ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी १० वर्षे पूर्ण झाला आहे अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार नसल्याची सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध विद्याशाखेअंतर्गत अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या १७९ परीक्षांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १० परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ८६ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या ३८ परीक्षा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या ४५ परीक्षा यापुढे विद्यापीठामार्फत घेण्यात येणार नसल्याचे विद्यापीठाच्या १० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.