Maharashtra Live blog Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर…

महाराष्ट्र बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचे सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबई न येण्याबाबत खडसावले….

शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नुकतीच व्हिसीद्वारे पश्चिम पूर्व/पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली

या बैठकीत अकार्यक्षम जिल्हाप्रमुखांना मोरेंनी चांगलेच खडेबोल सुनावले, तसेच बोलवल्याशिवाय मुंबईत यायचं नाही असा दमचं भरल्याची माहिती सूत्रांनी दिली

जिल्हाप्रमुखांनी वारंवार मुंबईत भेटीला न येता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षाच्या कामाकडे लक्ष द्यावं.

रिक्त पदनियुक्ती करून पक्षाची बांधणी करावी. विनाकारण मुंबईत येऊ नये.

याशिवाय अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना लवकरच डच्चूही दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या शिवाय शिवसेनेकडून ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू करण्याबाबतच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्याचे कळते.

रायगड, ठाणे, नाशिक, सातारा सांगली यासह इतर जिल्ह्यांमध्ये मित्र पक्षाकडूनच पाय खेचला जात असल्याने या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून स्वतंत्र निवडणूकीसाठी पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती

Comments are closed.