Maharashtra Live Blog Updates: राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भर

Maharashtra Live Blog Updates: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे  आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस असताना सुध्दा मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शनं करत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत कोणकोण अर्ज भरणार आणि त्यानंतर अर्ज माघारीसाठी कोण तडजोड करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी, 2 डिसेंबरला मतदान पार पडणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

Comments are closed.