रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
Maharashtra Live Blog Updates: बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनाला दीड महिना पूर्ण झाला..मात्र तपास योग्य पद्धतीनं होत नसल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी अनेक मंत्री आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या..काल आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली..या भेटीत अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली..तर यावर सकारात्मक उत्तर देत उद्या किंवा सोमवारी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात चर्चा घेतली जाईल असा शब्द राहुल नार्वेकरांनी दिल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. तर राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दीड तास सखोल चर्चा केलीय. ही चर्चा सकाळी अकरा ते साडेबाराच्या दरम्यान पार पडली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संसदेतही भेट दिली. यावेळी त्यांची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Comments are closed.