Maharashtra Live blog Updates: संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय; मुंबईत हलक्या सरी बरसणार
Maharashtra Live blog Updates: संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालाय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच त्रिभाषा सूत्र म्हणजेच हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय वाद रंगल्याचं आपण पाहिलं होतं..दरम्यान यासंदर्भात सरकारकडून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक पार पडली..या बैठकीत समिती कशी कामकाज करेल यासंदर्भात चर्चा झाली.. त्रिभाषा संदर्भात वेबसाईट तयार करण्याचा निर्णय समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली..या वेबसाईटवर जनतेला त्रिभाष सूत्रासंदर्भात मत मांडता येणार आहे.. तर त्रिभाषा सूत्र लागू करायचं की नाही याचा आढावा घेण्यासाठी समिती महाराष्ट्र दौरा करणार आहे..त्यानंतर 5 डिसेंबरला समिती शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली. या राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.