Live Blog Updates: डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात अमेरिकेला संबोधित करणार
ट्रम्प आज राष्ट्राला संबोधित करतील, त्यांचे संबोधन भारतीय वेळेनुसार सकाळी ६:३० वाजता होईल. दरम्यान, राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी ट्रम्प यांनी दावा केला की इराणच्या ‘नवीन राजवटीने’ युद्धविरामाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हा आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या अलीकडील विनंतीचा विचार करू. जर होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणे सुरूच ठेवू. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्रम्प यांचा दावा फेटाळत म्हटले की, आम्ही युद्धविरामाची विनंती केली नाही, ट्रम्प खोटारडे आहेत. दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे की, काही विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास युद्ध संपवण्यासाठी तेहरानकडे “आवश्यक इच्छाशक्ती” आहे.
Comments are closed.