महाराष्ट्रात सध्या आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे
Maharashtra Live Blog Updates: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सात जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे एकेक जागाच संख्याबळानुसार येत आहे. मात्र या एकेक जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. मविआत सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय. मात्र शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती आहे.
Comments are closed.