Maharashtra Live Blog Updates: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत ज

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडं लागलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर या सोडतीला प्रारंभ होणार आहे. 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे दरम्यान आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या शहरात ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण असेल, हे स्पष्ट होणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

Comments are closed.