Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान

मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी एका कार डिझायनरविरोधात 53 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 15 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार जयेश ठक्कर, हे ईव्ही क्षेत्रातील कंपनीचे संचालक असून, आरोपी डिझायनरने 2024 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधत आपल्या दोन मुलांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे सांगून भावनिक विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांमध्ये व्यावसायिक भागीदारीचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपीने दोन इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेल विकसित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नवीन कंपनी स्थापन करून त्यात आपल्या सुनेला संचालक करण्याचा प्रस्ताव दिला. यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला होता. ठक्कर यांनी 2.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास आणि आरोपीला मासिक वेतन देण्यास सहमती दर्शवली होती.

मात्र, वाहनांमध्ये बदल करण्याच्या कामासाठी दिलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता इतरत्र वळवण्यात आल्याचे ठक्कर यांच्या निदर्शनास आले. दोन वाहनांसाठी सुमारे 1.77 कोटी रुपयांचे व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात 53 लाख रुपये आरोपीच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे समोर आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.