Maharashtra Live Updates: 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान
मराठवाड्यामध्ये आज सहा जिल्ह्यात 115 सदस्यांसाठी मतदान होतंय.. फुलंब्री नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. यापूर्वी ही मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन तर 17 जागेसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मतदान प्रक्रियेपूर्वी सकाळी ईव्हीएम यंत्रांची तपासणी उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी , मतदान अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान होण्यासाठी प्रशासन सज्ज असून आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, फुलंब्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सुहास शिरसाठ तर महाविकास आघाडीच्या वतीने राजेंद्र ठोंबरे हे उमेदवार रिंगणात आहेत.
Comments are closed.