Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर…

Maharashtra LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्या फक्त एका क्लिकवर…

India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का?

India Vs Pakistan: टी-20 वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना उद्या 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हवामान अंदाजानुसार रविवारी कोलंबोमध्ये पावसाची 93 टक्के शक्यता आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Dilip Walse Patil : मी भक्कम, पण अजितदादांच्या जाण्यानं भावना आवरत नाहीत, दिलीप वळसे पाटील भावुक

पुणे : मला काहीही झालेलं नाही, मी भक्कम आहे. फक्त अजितदादा गेल्यानं, मला भावना आवरत नाहीत असं सांगताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) भावुक झाल्याचं दिसून आलं. सध्या सुरु असलेल्या राजकीय चर्चेत जायचं नाही अन् त्या चर्चांमध्ये पडायचंही नाही असं स्पष्ट करताना दिलीप वळसे पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर सुरु असलेल्या राजकारणावर काही बोलणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.

Comments are closed.