शिंदेसोबत थोडे फार जुळेल,पण राष्ट्रवादीसोबत कठीण…; भाजपकडून मराठवाड्यात स्वबळावर लढण्यासाठी च
छत्रपती संभाजीनगर: भाजपकडून (BJP) मराठवाड्यात स्वबळावर लढण्याचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. कालच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी (Marathwada inside story) ‘माझा’च्या हाती आली आहे. युतीही आणि स्वबळावरही लढण्यावर मध्यरात्रीपर्यंत भाजपची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको अशी पदाधिकाऱ्यांचीच मागणी असल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटासोबत थोडे फार जुळेल, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) जुळणं कठीण आहे अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सरकारला सकारात्मक वातावरण आहे का? यावर पदाधिकाऱ्यांचा होकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि शिंदेसेनेने (Shivsena) विधानसभेला दिलेल्या त्रासाचाही पदाधिकाऱ्यांनी यावेळी पाढा वाचल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.(Marathwada inside story)
मराठी इनसाइड स्टोरी: इनसैड स्टोरी इज इनसाइड स्टोरी आहे
भाजपाची मध्यरात्रीपर्यंत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती, या बैठकीमध्ये युती आणि स्वबळावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एकवेळ शिवसेना शिंदे गटाशी थोडेफार जुळेल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याचं समोर आलं आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आपली भूमिका मांडली आहे. सरकारला सकारात्मक वातावरण आहे का? या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांनी होकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे सेनेने विधानसभेत दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला आणि स्वबळावर लढण्याची भूमिका अनेकांनी मांडली आहे. यावेळी आठही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचे सुचविले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Marathwada inside story: राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको
भाजपच्या या बैठकीत मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकीत स्वबळावर लढल्यास पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर स्थानिक पातळीवर युती केल्यास काही जागांवर लाभ होऊ शकतो, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचंही समोर आलं आहे. पक्षाच्या ताकदीचा आणि मतदारांच्या भूमिकेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र बैठकीचे संकेत दिले आहेत. मराठवाड्यात भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या दिशेने पावले टाकत आहे, अशी चिन्हे या बैठकीनंतर स्पष्ट दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाशी थोडेफार जुळेल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नको अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ नोव्हेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे केले. ते भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीत बोलत होते. या बैठकीत फडणवीस यांनी स्पष्ट संकेत दिले की, निवडणुका महायुतीत लढवल्या जातील, मात्र स्थानिक पातळीवर गण, गट किंवा वॉर्डनिहाय युतीचा निर्णय कार्यकर्त्यांनाच घेता येईल. राज्यात टप्प्याटप्याने प्रथम नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद आणि शेवटी महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत, “प्रत्येक ठिकाणी स्थानिक ताकद आणि जनसमर्थन लक्षात घेऊन उमेदवार निवडले जातील,” असे स्पष्ट केले.
https://www.youtube.com/watch?v=_ql-ztgxk8g
आणखी वाचा
Comments are closed.