ZP, मनपा निवडणुकीची आजच घोषणा होण्याची चिन्हं, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Maharashtra Local body Election) घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा लागली असून, आजच या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेतच नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची चिन्हे आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून याच परिषदेत ते निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडणार आहेत.
पहिला टप्पा: राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका.
दुसरा टप्पा: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका.
तिसरा आणि अंतिम टप्पा: महानगरपालिका निवडणुका.
पहिल्या टप्प्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, आणि 21 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचे बंधन आले असून, निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आज सर्वाधिक मानली जात आहे.
Maharashtra Local Body Election: एकूण संस्थांचा आकडा
या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिका या सर्व संस्थांची मुदत संपल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे.
Maharashtra Local Body Election: राजकीय तापमान वाढणार
या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मतदार घोळासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी दाद मागितली होती. निवडणूक आयोगांची भेट देखील घेतली होती. मतदार यादीच्या घोळाबाबत मनसे आणि महाविकास आघाडीने संयुक्त सत्याचा मोर्चा देखील काढला होता. मतदार यादीत घोळ आहेत. याचे पुरावे देखील समोर ठेवले होते. मात्र आता आज आयोगाने निवडणुकीची घोषणा केली तर विरोधक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
			
											
Comments are closed.