Election LIVE: राज्यभरात महानगरपालिकांचा धुरळा; कोणाची लागली वर्णी? तर कोणाचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे राज ठाकरे: मुंबई आणि ठाण्यामध्ये अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि शिंदेंच्या सेनेकडून अधिकृत उमेदवार यादी अजूनही जाहीर नाही.
काही ठिकाणी ऐनवेळी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने आणि बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नाव गुप्त ठेवल्याने उमेदवारांची यादी अर्ज भरण्याची वेळ झाल्यानंतर सुद्धा जाहीर नाही.
महापालिका निवडणुकीमध्ये खरंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाते युती आघाडीच्या जागावाटप होतं आणि उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर त्यांना एबी फॉर्म देऊन ते अर्ज भरतात.
मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये कमालीची गुप्तता उमेदवारांची नावे जाहीर करण्यात पाळली जात आहे शिवाय ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना सुद्धा संधी दिली जात असल्याचं समोर येतंय. त्यामुळे ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना या दोन्ही पक्षांनी मुंबई आणि ठाण्यामध्ये अधिकृत यादी जाहीर केलेली नाही
Comments are closed.