Mayuri Jagtap | घरात मारहाण, रस्त्यातही मारहाण; नवऱ्याने माहेरी सोडलं म्हणून जीव वाचला – मयुरी जगताप
Mayuri Jagtap | घरात मारहाण, रस्त्यातही मारहाण; नवऱ्याने माहेरी सोडलं म्हणून जीव वाचला – मयुरी जगताप
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane Death) (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. आता हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली आहे. हगवणे कुटुंबियांकडून हगवणे मोठी सून मयुरी जगताप (Mayuri Jagtap) हिला मारहाण करण्यात येत होती. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केला आहे.
हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिच्या आईने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, “हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. शशांक हगवणे, करिष्मा हगवणे आणि लता हगवणे यांनी तिला वारंवार त्रास दिला. मात्र, माझ्या मुलीने त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी मला दिली होती. ‘मला त्रास दिला जातोय, मारहाण होतेय,’ असे ती नेहमी सांगायची.” “या प्रकरणी आम्ही दोन-तीन वेळा कुटुंबीयांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलीला समजावूनही सांगितले. तिने काही काळ सहन केले, पण सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. जेव्हा ती मर्यादा ओलांडली, तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणे अशक्य झाले. तिला मारहाण करण्यात आली,” असे त्या म्हणाल्या.
Comments are closed.