Maharashtra minister Pratap Sarnaik bats for cable taxis in Mumbai urk


मुंबई – परिवहन मंत्रालय मिळाल्यानंतर प्रताप सरनाईक अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी केबल टॅक्सी सुरु करण्याचा विचार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. मुंबई आणि परिसरात केबल टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी वेगवेगळे पर्याय तपासावे लागतील, त्यापैकी केबल टॅक्सीचा एक पर्याय आहे, त्याचा विचार केला जाईल असे सरनाईक म्हणाले.

परिवहन मंत्रालय मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. इतर कोणी त्यांना मिळालेल्या खात्यामुळे नाराज असेल, मात्र मी आनंदी आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटी सेवा गावागावात पोहचलेली सेवा आहे, असं सरनाईक म्हणाले.

– Advertisement –

मुंबईत केबल टॅक्सी चालवणार

केबल टॅक्सी हा मुंबई महानगर क्षेत्रात परिवहनासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी केबल टॅक्सी नाही. जर आपण 15 आसनी किंवा 20 आसनांची केबल टॅक्सी चालविली तर वाहतूक कोडींतून सुटका होईल. जर आपण मेट्रो चालवू शकतो तर केबल टॅक्सी चालविण्यात कोणतीही समस्या नाही. कारण आपल्याला ‘रोप वे’ उभारण्यासाठी जास्त जमीन लागणार नाही. केबल टॅक्सी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत चालायला हव्यात, त्यामुळे ही प्रणाली योग्य प्रकारे चालेल असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

केबल टॅक्सी चालवण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगत त्यांनी कर्नाटक सरकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही क्रमांक एकची वाहतूक व्यवस्था आहे. तिथली परिवहन सेवा कशीकाय नफ्यात आहे, याचा अभ्यास केला जाईल आणि त्यांची महाराष्ट्रासाठी मदत घेतली जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले.  कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मात्र चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे, असेही सरनाईक म्हणाले.

– Advertisement –

एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन करणार – सरनाईक 

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यामधील राजकीय आणि युनियनचा हस्तक्षेप टाळण्यासाठी बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. गुजरातच्या एसटी डेपोंपाहून आपल्या येथील एसटी डेपोंचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. एसटी महामंडळात सुसूत्रता आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील असेही सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा : Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये 1,222 शस्त्र परवाने कोणाच्या आशीर्वादाने? अंजली दमानियांचा सवाल

मंत्रालयात कॅलेंडर विकायला यायचो

वयाच्या 12व्या 13व्या वर्षी दादरला शाळेत शिकायला होतो, तेव्हा मंत्रालयात अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायला यायचो, अशी जुनी आठवण आज मंत्रालयात आल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी सांगितली. जोपर्यंत हाफ पँट होती तोपर्यंत लोक माझ्याकडून अगरबत्ती आणि कॅलेंडर विकत घ्यायचे. फुल पँट आल्यानंतर मी रिक्षा चालवायला लागलो, अशा जुन्या आठवणींना प्रताप सरनाईक यांनी यावळी उजाळा दिला.

Edited by – Unmesh Khandale



Source link

Comments are closed.