राज्यातील पूर परिस्थितीमुळे MPSC च्या परिक्षा पुढे ढकलल्या, जाणून घ्या नवी तारीख

राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात मोठा पूर आला आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती असल्याने 28 सप्टेंबरला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2025 ची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्य सेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहेत. राज्यभरातून लाखो उमेदवार परीक्षा देणार आहेत. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्य सेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. परंतु आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे जाहिरात येण्यास विलंब झाला आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अखेर आयोगाने 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आता 28 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र आता राज्यातील पूर परिस्थितीमुळे ही परीक्षा 9 नोव्हेंबरला येणार आहे.
Comments are closed.