कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत…; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Maharashtra Nagarsevak Winner List Nagarpalika Nagarparishad Nagarpanchayat Election Results 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवकांची यादी समोर येत आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. (निकाल येतील, तशी यादी अपडेट होईल)
राज्यातील नगपरिषद आणि नगरपंचायतींमधील विजयी नगरसेवकांची यादी- (Maharashtra Nagarsevak Winner List 2025)
सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार विजयी-
अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी
सासवड नगरपरिषद-
प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी..सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी….
चंदगड नगरपंचायत-
राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी
तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार 3 विजयी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायत साठी आले होते प्रचाराला
भाजप शिवसेनेला चंदगडमध्ये सहा ठिकाणी धक्का
पालघरमधील जव्हार नगरपरिषद-
जव्हार नगरपरिषदेवर भाजपाची आघाडी . नगरसेवकपदाचे भाजपाचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी.
रहिमतपूर-
प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी
3 भाजप उमेदवार विजयी
आणखी वाचा
Comments are closed.