Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका
Maharashtra News LIVE Updates: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. तर सध्यातरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नाही. संचारबंदी अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या घडामोडींसह राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर…
Comments are closed.