Maharashtra Police Transferred 22 officers reshffle
अगदी पाच ते सहा दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील 43 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर, अन्य 37 पोलीस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबई : अगदी पाच ते सहा दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील 43 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर, अन्य 37 पोलीस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रायगड, अहिल्यानगर, पुणे, नांदेड, अकोला, नागपूर शहर. मुंबई, गडचिरोली, सिंधुदुर्ग, ठाणे शहर, बुलढामा, सातारा, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना या बदल्या करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Police Transferred 22 officers reshffle)
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर, रायगड पोलीस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कारण रायगड पोलीस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलीस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.
हेही वाचा… Police Transfer : मुंबई पोलीस दलात 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; 37 जणांना बढती देऊन बदली
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई पोलीस उप आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची ठाणे शहराच्या पोलीस उप आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, विशेष कृती दलातील (आर्थिक गुन्हे) पोलीस उप आयुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार दोषी जे लातूरचे पोलीस अधीक्षक होते, त्यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी संजय जाधव यांची सुद्धा बदली करण्यात आली, परंतु, त्यांची नेमणूक नेमकी कुठे करण्यात आली आहे, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे पोलीस दलाच्या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
Comments are closed.