अमरावतीत राणा-खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर; पालिका निवडणुकीच्या तोंडावर शाब्दिक चकमक
अमरावती राजकारण: अमरावती जिल्ह्यात राणा-खोडके वाद सर्वश्रुत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढणार की स्वबळावर याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान भाजप नेत्या यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी स्वबळावर लढणार आणि महापौर भाजपचाच होणार, असं वक्तव्य केलं. आणि याला प्रत्युत्तर देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी तर थेट युवा स्वाभिमान पक्षावर निशाना साधत युती शक्यच नाही, असं विधान केलं. मात्र आम्ही भाजप सोबत जायला तयार पण युतीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष असेल तर ही युती होणं शक्यच नाही, असे ही संजय खोडके म्हणाले. त्यामुळे आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत राणा-खोडके वाद चव्हाट्यावर आला आहे.
..तर ही युती होणं शक्यच नाही, संजय खोडकेंचा इशारा
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप अमरावती पालिका स्वबळावर लढणार, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावती महापालिकेत भाजपशी युतीचा वरच्या स्तरावर निर्णय जरी होत असेल, तरी अमरावतीत राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार. त्यांच्यासोबत आमचं ताळमेळ बसूच शकत नाही, असं संजय खोडके यांनी सांगितलंय. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
आम्ही सुद्धा पालिका निवडणूक स्वबळावर लढू- संजय खोडके
भाजप जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवत असतील तर आम्हीपण स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे. अमरावतीत भाजपने सांगितले की, आम्ही स्वबळावर लढू तर आम्हीसुद्धा पालिका निवडणूक स्वबळावर लढत आहे आणि याची तयारी सुद्धा आम्ही सुरू केली आहे. अमरावतीत 100 टक्के युती होऊ शकणार नाही..काही आमचे तत्व आहे. आमच्या सोबत भाजप असली तर आम्ही तयार आहोत, पण भाजप सोबत जे सहयोगी पक्ष आहे जे अमरावतीचे आहे. त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही. नाहीतर आम्ही स्वबळावर लढू. असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.