देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; चर्चेला उधाण


महाराष्ट्राचे राजकारण: राज्यात सध्या सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local Body Election 2025) वारे वाहत आहे. त्याअनुषंगाने सामान्य कार्यकर्ता ते पक्षातील उच्च पदस्थ नेते कामाला लागले आहे. अशातच हि निवडणुक (Municipal Elections) प्रामुख्याने स्थानिक कार्यर्त्यांने हातात घेतलेली असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर (Election 2025) प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेल्या अनके दिवसांपासून जोमाने तयारीला लागले आहे. मात्र सध्या स्थानिक नेत्यांकडून सगेसोयरे आणि नातेवाईकांनाच उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या मनात कमालीची नाराजी पसरली आहे. परिणामी आता ‘पंचायत’मधील ‘देख रहा है बिनोद…’ या डायलॉगचीच सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

सध्यास्थानिक नेत्यांकडून सगेसोयरे आणि नातेवाईकांनाच उमेदवारी देत सरकारमधल्या मंत्र्यांकडून कुटुंबियांनाf आणि प्राधान्य देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांनी लागल्यानंतर कार्यकर्त्यांना संधीची अपेक्षा होती मात्र, त्यावर देखील मंत्री आणि आमदारांच्याच नातेवाईकांni डल्ला मारल्याचे चित्र आहे.

Maharashtra Politics: कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?

चिखलदरा नगर परिषद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी यंदा पहिल्यांदाच अर्ज भरल्याची माहिती आहे.

जामनेर नगरपरिषद

मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला. एकीकडे राज्याची जबाबदारी महाजनवर असताना दुसरीकडे आपल्याच पत्नीला उमेदवारी देऊ करण्यात आली आहे.

खामगाव नगर परिषद

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी दिलीहे. भाजपकडून खामगावमध्ये स्वबळाचा नारा दिलाय. मात्र, नातेवाईकांना देखील सोबतच प्राधान्य दिलंय.

पुसद नगरपरिषद

राज्यमंत्री इंद्रनील नाईकांकडून पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

फलटण नगरपरिषद

फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना असणार आहे. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत यांना शिंदे सेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊ केली आहे. रणजितसिंह निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह भाजपचे उमेदवार आहेत.

भुसावळ नगरपरिषद

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट देण्यात आले आहे. अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

यवतमाळ नगरपरिषद

आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या कन्या प्रियदर्शिनी वुईके यांना नगराध्यक्षपदाची भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.