Maharashtra Politics Ramdas Athawale made big statement on coming together with Prakash Ambedkar
एकत्र येण्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली असून ते खरंच त्यांनी केलेल्या विधानानुसार विचार करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा लवकरच एकत्र येतील, असे बोलण्यात येत आहे. त्यामुळे सध्या राजकारणात रंगलेल्या या चर्चा खरंच होणार आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण आता याच एकत्र येण्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली असून ते खरंच त्यांनी केलेल्या विधानानुसार विचार करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Maharashtra Politics Ramdas Athawale made big statement on coming together with Prakash Ambedkar)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य करत म्हटले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि आजही एकत्र आहेत. अजित पवारांचे म्हणणे एकच होते की, तुम्हाला शिवसेना चालते, तर भाजपा का चालत नाही? शरद पवार यांच्यासारखा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांद्या लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सोबत आले असते तर शरद पवार या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. मात्र, अजूनही ती वेळ गेलेली नाही. शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे, असे आठवलेंकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – Maharashtra Police : आता पोलीस हेड कॉन्स्टेबलही करणार गुन्ह्यांचा तपास; फक्त काही अटी पूर्ण कराव्या लागतील
तर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल. तरी मला अस वाटते की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. कारण दोघांना एकत्रित यायचे असेल तर त्यांनी यावे. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा टोला देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. त्यामुळे आता आठवलेंच्या या विधानावर स्वतः प्रकाश आंबेडकर काय मत व्यक्त करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे, त्यामुळे आता ते खरंच त्यांनी केलेल्या विधानानुसार विचार करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते बुचकळ्यात, मनसेच्याच नेत्याने मांडले मत
Comments are closed.