Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहीजे मी कोणत्याही बाबा कडे जात नाही विश्वास ठेवता कामा नये महिलांनी न घाबरता समोर आले पाहिजे आणी गुन्हा दाखल केले पाहिजे आणि त्या बाबावर कारवाई झाली पाहिजे ———————————————————— Pune रामदास आठवले (टीटी): नाशिकमधील कॅप्टन खरात या भोंदू बाबाला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीचीही शिक्षा द्यायला हवी. अशा भोंदू बाबांच्या नादी लागणं अत्यंत चुकीचं आहे. काही संत आणि बाबा खरोखर चांगलेही असतात, त्यामुळे योग्य ठिकाणी जाण्यास हरकत नाही. मात्र, फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. सरकारने या प्रकरणात सखोल चौकशी करून त्याच्याकडे असलेली संपत्ती नेमकी कुठून आली, याचा शोध घ्यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी. विशेषतः महिलांना आवाहन आहे की, अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नका. कोणतीही संशयास्पद किंवा चुकीची बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या.
Comments are closed.