महाराष्ट्राला मिळाला ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार, सांगली जिल्हा परिषदेला देशात अव्वल क्रमांक

देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना ई-गव्हर्नन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेला मिळाला आहे. या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांना सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या श्रेणीत देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अव्वल क्रमांक पटकावून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या डिजिटल गव्हर्नन्स उपक्रमाअंतर्गत गावासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे पूर्णपणे ऑनलाइन सेवा वितरण, कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) यावर आधारित आधुनिक अंगणवाडी, ‘माझी पंचायत अ‍ॅप’द्वारे तक्रार निवारण आणि ‘निर्णय अ‍ॅप’द्वारे ग्रामसभा निर्णयांचे ऑनलाइन प्रकाशन यांचा समावेश आहे. सांगली येथे येण्यापूर्वी विशाल नरवाडे हे धुळे जिह्याचे सीईओ म्हणून कार्यरत होते.

सांगलीत डिजिटल क्रांती

या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे यशस्वी मॉडेल सांगली जिह्यातील सर्व 700 ग्रामपंचायतींमध्ये राबविणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सांगली जिह्यात डिजिटल क्रांती होणार आहे.

Comments are closed.