Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर

Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर

तुषार दोशी सातारा जिल्हा परिषद निवडणूक 2026: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी (Satara Zilla Parishad Election 2026) मोठा राडा झाला होता. पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी देखील सातारा राडा प्रकरणी नाराजी बोलावून दाखवली होती. तसेच शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशी (Tushar Doshi) यांना निलंबन करण्याची मागणी केली होती. मात्र यानंतरही तुषार दोशी पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांना भोवले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Comments are closed.