शिखर बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी, 20 वर्षांत प्रथमच घसघशीत बोनस

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्मचायांना दिवाळीची दणदणीत भेट दिली आहे. बँकेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना तब्बल 14 टक्के बोनस जाहीर केला आहे. गेल्या 20 वर्षांतील हा उच्चांकी बोनस आहे.
बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली. राज्य सहकारी बँक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी बजावत आहे. यंदा बँकेने 651 कोटींचा विक्रमी नफा कमावला आहे. 2017-18 साली बँकेचा प्रति कर्मचारी 26 कोटी असलेला व्यवसाय आता 75 कोटींवर पोहोचला आहे. आशिया खंडातील सर्वात सक्षम बँक म्हणून बँकेने नावलौकिक मिळवला आहे. या वाटचातील कर्मचायांनेच मोठे योगदान आहे. याची जाणीव ठेवून कर्मचाऱ्यांना उच्चांकी बोनस देण्यात आला आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये भेट
सामाजिक बांधिलकी व नैतिकतेचा दृष्टिकोनातून बँक प्रशासनाने कंत्राटी कर्मचायांना दिवाळी भेट म्हणून 10 हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड झाली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनी बोनसची घोषणा करण्यात आली. बोनसची रक्कम त्याच दिवशी खात्यात जमा करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
Comments are closed.