महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धा – रेगन अल्बुकर्क, संपदा भिवंडकरला विजेतेपद

खार जिमखाना येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत टीएसटीटीएचा खेळाडू रेगन अल्बुकर्क आणि संपदा भिवंडकर यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या (एमएसटीटीए) संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित अल्बुकर्कने टीएसटीटीएचा बिगरमानांकित मंदार हर्डीकरवर 4-0 (11-7, 11-4, 11-5, 11-7) असा सहज विजय मिळवला

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत दुसऱया मानांकित संपदा भिवंडकरने टीएसटीटीएच्याच खिया शाहवर 4-0 (11-8, 11-4, 11-8, 11-7) अशा फरकाने मात करत केली

ठाण्याच्या सुक्राती शर्माने 17 आणि 19 वर्षांखालील एकेरी गटामध्ये बाजी मारताना दुहेरी मुकुट पटकावला. 17 वर्षांखालील मुली एकेरीमध्ये अव्वल मानांकित सुक्राती शर्माने टीएसटीटीएच्या आयुषी शिरगावकरचा 3-0 (11-6, 12-10, 11-2) असा पराभव केला.

19 वर्षांखालील मुली एकेरी गटात बिगरमानांकित सुक्रातीने मुंबई शहरच्या अर्पिता बोऱहाडे हिला 4-1 (11-8, 13-11, 11-7, 6-11, 11-5) असे हरवले.

17 वर्षांखालील एकेरी मुले एकेरीत टॉप सीडेड टीएसटीटीएच्या आकांक्ष साहू त्याचाच सहकारी अहान गोसरलाव3-0 (12-10, 11-6, 11-5) असे पराभूत केले.

19 वर्षांखालील एकेरी मुले एकेरी गटात अव्वल मानांकित टीएसटीटीएच्या अर्णव क्षीरसागरने त्याचाच सहकारी आयुष सोनवणेवर 4-1 (11-8, 11-9, 13-15, 12-10, 11-7) असा विजय मिळवला.

Comments are closed.