Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष,प्रफुल पटेलांकडून नावाची घोषणा

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल पटेलांकडून नावाची घोषणा, दादांची स्वप्नं अधुरी राहणार नाहीत, अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांची ग्वाही…

बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची…सुनेत्रा अजित पवारांचं नाव राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलंय…मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली….28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाची धुरा नेमकी कुणाकडे जाणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं…मात्र आधीपासूनच सुनेत्रा पवारांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं….दरम्यान सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाल्याचं प्रफुल पटेलांनी जाहीर केलं…सुनेत्रांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मोठं यश मिळवेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला…तसंच अजित पवारांच्या अपघातावर आणि पक्षाबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांवर पटेलांनी जोरदार निशाणा साधला…

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांसह रोहित पवारांवर निशाणा साधलाय..

Comments are closed.