Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
सकाळी उठल्य़ावर चहा कुणी करायचा… घरातली कामं कुणी आवरायची…कामावर जाताना होणारी अशी धावपळ आपल्यासारख्या अनेकांच्या घरात ठरलेली… याच मुद्दयावरून थेट सुप्रीम कोर्टानं एक टीपणी केलीय. ‘ती पत्नी आहे, कामवाली नाही’ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मात्र त्यावरून पत्नी पीडित आक्रमक झालेत… काय घडतंय नेमकं… पाहुयात…चूल, मूल आणि पाळण्याची दोरी… या शब्दांपासून स्त्रिया खूप पुढे आल्यात…घरातली सगळी व्यवधानं सांभाळत असतानाच सगळ्याच क्षेत्रातल्या अग्रगण्य पदापर्यंत त्या जबाबदाऱ्या लिलया पार पाडताहेत…मात्र त्याचवेळेला घरातली कामं महिलेनं करायची की पुरूषानं हा प्रश्न आजही अनेक घरात आहे…मुख्यत: शहरांमधली अवस्था अशी की घरातले स्त्री-पुरूष दोघेही कमावते असतात. त्यामुळे नोकरीच्या जबाबदाऱ्यांसोबतच घरातल्या कामांचीही जबाबदारी नेमकी कुणी सांभाळायची हा प्रश्न समोर उभा राहातो…यावरून सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केलीय…तुम्ही लग्न करताना पत्नीला मोलकरीण समजायला नको.पत्नीनं घरकाम न करणं ही ‘क्रूरता’ नाही .पतीनंही घरकामात मदत केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचं निरीक्षण
Comments are closed.