Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्यासह देशातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर…

Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हालचाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मागितला वेळ

राज्यसभेसाठी तीन मार्चला उमेदवारी अर्ज भरायचा आहे, सध्या सहा दिवस अर्ज भरण्यासाठी राहिलेले असताना महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार म्हणून कोणते नाव पाठवायचे? यावर अद्याप एकत्रित चर्चा झालेली नाही. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी मिळून संख्याबळानुसार एकच उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे, आणि या एकाच जागेवर तिन्ही पक्षांकडून उमेदवार देण्याची तयारी एक प्रकारे दर्शवली जात आहे. 
 
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितला असून शरद पवार व आपल्या पक्षातील इतर नेत्यांसोबत एकत्र चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. 
 
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे… शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे त्यानंतर पवारांशी चर्चा करून उमेदवारी संदर्भातला पुढचा निर्णय पक्ष महाविकास आघाडीला कळवणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना दोन्ही पक्ष राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा करत असून दोन्ही पक्ष आपल्या पक्षाचे उमेदवार देण्यावर इच्छुक आहेत.
 

Comments are closed.