Maharashtra Weather Meteorological Department predicts that hot weather will start from February


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात विविध बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री गारवा तर दिवसा उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रात्री जाणवणारा गारवाही कमी झालेला पाहायला मिळत आहे. परंतु, आता हा गारवा पूर्णतः कमी होणार असून फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके लागणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना यंदाच्यावर्षी महिन्याभरआधीपासूनच गरमी सहन करावी लागणार आहे. (Maharashtra Weather Meteorological Department predicts that hot weather will start from February)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार असला तरी उत्तर महाराष्ट्रात चार ते पाच दिवस तीव्र थंडी राहण्याची स्थिती आहे. सध्या प्रशांत महासागरात ला नीना स्थिती सक्रीय असून मध्य व पूर्व भागात तापमान सामान्य तापमानाच्या खाली आहे. म्हणजेच कमजोर आहे. एप्रिलच्या शेवटी ला नीना सक्रीय होऊन तो पुन्हा तटस्थ होणार आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर, हवामान विभागाचे महासंचालक, डॉ मृत्यूंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात किमान व कमाल तापमानाचा पारा आता चढताच राहणार असून मुंबईसह किनारपट्टी भागात तसेच मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा… Leopard Safari : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार,आशिष शेलार यांची घोषणा

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानाचा पारा घसरणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान 1-4 अंशांनी वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. या महिन्यात बहुतांश ठिकाणी तापमान चढेच राहणार असून चार ते पाच दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. देशभरात नोव्हेंबर महिन्यापासून साधारणपणे थंडीला सुरुवात होते. थंडीचा हा हंगाम फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन उन्हाचा कडाका जाणवू लागतो. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर, मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये काही दिवस थंडी कायम राहणार आहे.



Source link

Comments are closed.