Maharashtra Weather Next three days important for the state, Meteorological Department warns of alert for these districts


हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी 19 जूनला ठाणे आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित असून, पालघरमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील.

मुंबई : रविवारपासून (ता. 15 जून) राज्यभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. 16 जून) मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला. पण मंगळवारी (ता. 17 जून) मात्र अनेक ठिकाणी वरुणराजाने उसंत घेतली. पण अधूनमधून सरी बरसणे सुरू होतेच. बुधवारी (ता. 18 जून) मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. तर हवामानही ढगाळ राहिले. तर पुणे व घाटमाथ्यावरील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. अशातच आता हवामान विभागाकडून पुढील तीन राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. कोकणपट्टीवर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather Next three days important for the state, Meteorological Department warns of alert for these districts)

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे यलो अलर्ट आहे. पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वतर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो, अशी शक्यता सुद्धा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Seed Mother Rahibai Soma Popere : जीवापाड संस्कृती जपणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे

तसेच, गुरुवारी 19 जूनला ठाणे आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित असून, पालघरमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. 20 आणि 21 जून रोजी पालघर आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी होऊन मध्यम पाऊस पडेल, तर ठाण्यात 21 जून रोजी तुरळक ठिकाणी पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथ्यावर उद्या गुरुवारी (ता. 19 जून) रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, त्यानंतर 20 आणि 21 जून रोजी मध्यम पाऊस राहील. नाशिक घाटमाथ्यावर 18 जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित असून, त्यानंतर मध्यम पाऊस सुरू राहील. जळगाव जिल्ह्यात 19 जूनला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस राहील. अहमदनगर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुढील चारही दिवस तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.





Source link

Comments are closed.