Maharashtra Weather Update Mumbai temperature IMD Pune


राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वातावरणातील बदल पाहायला मिळत आहेत. सध्या थंडी गायब झाली असून, राज्याच्या अनेक भागांत उकाडा जाणवू लागला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमान वाढले असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे.

Maharashtra Weather Update मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वातावरणातील बदल पाहायला मिळत आहेत. सध्या थंडी गायब झाली असून, राज्याच्या अनेक भागांत उकाडा जाणवू लागला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमान वाढले असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर गेला होता. (Maharashtra Weather Update Mumbai temperature IMD Pune)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने वर जात आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाने 36शी गाठली आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली आहे.

शुक्रवारी सोलापूर, साताऱ्यात किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते. नांदेड-लातूरमध्ये 21 अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यात शुक्रवारी 18-20 अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, येत्या 24 तासात ही वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, येत्या 5 दिवसात राज्यात किमान व कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिकच असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात हळूहळू तापमानात वाढ होईल, असे अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.

राज्यात कुठे किती तापमान?

  • पुणे (CME दापोडी) 43.4°C
  • लोणावळ्यात 38.3°C
  • तळेगावमध्ये 37.6°C
  • शिवाजीनगर 34.4°C
  • सातारा (39.3°C)
  • कराड (39.3°C)
  • सोलापूर (37.1°C)
  • नाशिक 15.6°C
  • कुलाबा (28.4°C)
  • सांताक्रूझ (34.0°C)
  • लातूर (35.4°C)
  • परभणी (34.8°C)
  • नांदेड (34.0°C)
  • हिंगोली (34.9°C)

हेही वाचा – Ladki Bahin : अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांचे पैसे परत घेणार? अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले



Source link

Comments are closed.