Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यात अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबईसह अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेने त्रासलेल्या लोकांना जरा दिलासा मिळाला. दरम्यान मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शकत्या हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ठाण्यात आणि मुंबईत ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईला आज आणि उद्या ( मंगळवार- बुधवार) ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच दक्षिण कोकणामध्येही ‘यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोकण- गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात मंगळवारी 13मे आणि बुधवारी 14 मे रोजी मध्यम स्वरूपात पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातही ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. तसेच पुण्यातील तापमानात देखील घट झाली असून तेथेही पावसाचे आगमन झाले आहे. पुढील चार दिवस पुण्यातही पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुणे शहराला ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिह्यांत पावसाची शक्यता
सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर.

विदर्भाला आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’! नाशिकमध्ये पाचव्या दिवशीही धुंवाधार

Comments are closed.