विधानपरिषदेत प्रसाद लाड यांना शॉक लागला; दरेकर म्हणाले, काही झाल्यास पुतळा उभारु, सभागृहात पिकल

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपूर 2025: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सध्या नागपुरात सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधान परिषदेचं कामकाज सुरु असताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शॉक लागला. विधान परिषदेत बोलण्यासाठी त्यांच्या बाकावर उभे राहताच दोन-तीनवेळा शॉक लागल्याचं प्रसाद लाड यांनी सभागृहात सांगितलं. मला काही झालं तर राज्याचे नुकसान होईल, असा मिश्कील टोलाही प्रसाद लाड यांनी शॉक लागताच सभागृहात बोलावून दाखवला.  यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

विधान परिषदेच्या सभागृहात नेमकं काय काय घडलं? (Maharashtra Winter Session Nagpur 2025)

मला इकडे शॉक बसतोय- प्रसाद लाड

मला काही झालं तर राज्याचे नुकसान होईल : प्रसाद लाड

तुम्हाला काही झालं तर पुतळा उभारू : प्रविण दरेकर (खाली बसून)

शॉक प्रकरणाची एसआयटी चौकशी करा : अनिल परब

त्यांची आत्ताच एक चौकशी झाली आहे : प्रविण दरेकरांच्या विधानाने सभागृहात हशा

तुम्ही सभागृहाचे लाड आहात.. तुम्हाला काही होऊ देणार नाही.. काळजी घेतली जाईल : सभापती राम शिंदे

आणखी वाचा

Comments are closed.