जिमनॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला!
डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जिमनॅस्टिकमधील पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. एरोबिक्समध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली.
भागीरथी संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्य शहा, स्मित शहा व रामदेव बिराजदार यांनी पुरुषांच्या तिहेरी गटात १७.२५ गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. याचबरोबर महाराष्ट्राने सांघिक गटातही सुवर्णपदक जिंकले. सांघिक गटात संदेश चिंतलवाड, स्मित शहा, अभय उंटवाल, उदय मधेकर, विश्वेश पाठक यांनी १६.६० गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला (सुवर्ण पदक जिंकून दिले.
याचबरोबर पुरुष एकेरी आर्य शहाने १८.०५ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. महिला एकेरीत गौरी ब्राह्मणे हिने १५.७५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. मिश्र दुहेरी श्रीपाद हराळ व मानसी देशमुख यांनी १५.२० गुणांसह महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
दंगल चित्रपटाचा महाराष्ट्राच्या स्वाती शिंदेकडून अॅक्शन रिप्ले…!स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत
मिडलाईनने राजाभाऊ देसाई चषक जिंकला
ॲथलेटिक्समध्ये संजीवनी जाधवला रौप्यपदक
Comments are closed.