8 thousand crores worth of deals in ‘Waves’, Mumbai conference concludes in marathi


महाराष्ट्र सरकारने वेव्ह्जमध्ये 8 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे.

WAVES Summit : मुंबई : चार दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या वेव्ह्ज परिषदेचा रविवारी समारोप झाला. वेव्ह्जच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्ह्जचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला. महाराष्ट्र सरकारने वेव्ह्जमध्ये 8 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, तर राज्याच्या उद्योग विभागाने प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3 हजार कोटी रुपयांचे आणि 2 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. (8 thousand crores worth of deals in ‘Waves’, Mumbai conference concludes)

वेव्ह्ज बाजारने कमावले 1328 कोटी रुपये

वेव्ह्ज बाजारने चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होते, ज्यामध्ये 3 हजारहून अधिक बी 2 बी बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणून, न्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कँटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला.

हेही वाचा – Rajnath Singh : तपस्या करणाऱ्या हातांना तलवार देखील… केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी दिला इशारा

ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीतविषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राईम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझारचे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे ‘देवी चौधराणी’ चित्रपटाची घोषणा, जो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि ‘व्हायलेटेड’ चित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.

हेही वाचा – Tel Aviv Attacked By Houthi : इस्रायलला जाणारं एअर इंडियाचं विमान वळवलं; तेल अवीवजवळ क्षेपणास्त्र हल्ला



Source link

Comments are closed.