Aditya Thackeray demands a befitting reply to the terrorist attack in Pahalgam


दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात आज (22 एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. त्यामुळे आता विरोधक या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

मुंबई : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात आज (22 एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सुरुवातीला 2 पर्यटकांचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाल्याचे सांगितले जात होते. पण, आता 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. त्यामुळे आता विरोधक या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना दिसत आहे. (Aditya Thackeray demands a befitting reply to the terrorist attack in Pahalgam)

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही, तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या हल्ल्याप्रकरणी टीका केली आहे.

हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

अंबादास दानवे यांनी ट्वीट करताना म्हटले की, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा संतापजनक आहे. धर्म विचारून दाहशतवाद्यांकडून पर्यटकांचा जीव घेतला गेला. हे दहशतवादी तर ठेचले पाहिजेतच. पण यांना मदत करणाऱ्यांना पण वेचून वेचून यमसदनी पाठवायला हवे. काश्मिरात कलम 370 हटून पर्यटक वाढला असेल, पण त्याला सुरक्षा दिली जाणार नसेल तर ही सगळी टाकलेली पाऊले व्यर्थ आहेत, अशी खंत अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Pahalgam Attack : पाकड्यांना धका शिकवणार; काय म्हणाले एकनाथ शिंदे?





Source link

Comments are closed.