Ajit Pawar believes that the government is committed to providing quality education and healthcare to the Muslim brothers in the state


मुंबई : विरोधकांच्या गदारोळात महिनाभरापूर्वी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. यानंतर केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा देखील केला. मात्र यानंतर देशासह राज्यातील वातावरण तापलेलं आहे. वक्फ सुधारण विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच अनेक मुस्लिम धर्मगुरू, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना या विधेयकाला विरोध करताना दिसत आहे. मात्र मुस्लिम नागरिकांमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाप्रकरणी असलेली नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील महायुती सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. (Ajit Pawar believes that the government is committed to providing quality education and healthcare to the Muslim brothers in the state)

राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज (29 एप्रिल) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन, निधी वितरण, शिक्षण व इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – Rohit Pawar : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग…; महायुतीबाबत रोहित पवारांचं भाकीत

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरू असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना अजित पवार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. अजित पवार म्हणाले की, राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Maharashtra Cabinet : पीकविमा योजनेत होणार बदल; मंत्रिमंडळ बैठकीत 11 महत्त्वाचे निर्णय





Source link

Comments are closed.